आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलित विलासराव शिंदे महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलित विलासराव शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त उपस्थित राहून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे. काहीकाळ त्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदीही काम केले होते. आज महाविद्यालयाच्या उदघाटनाला उपस्थित राहून आनंद झाला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा व्यासंग मोठा होता. शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य, जिल्हा ग्रंथालय संघटना, राजाराम शिक्षण संस्था अशा संस्थांतही त्यांनी काम केले. त्यांच्या नावाने महाविद्यालय सुरु होत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. हा त्यांच्या कार्याचा केलेला उचित सन्मानच आहे.
यावेळी समवेत मा. जयंत पाटील साहेब व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *