आमच्याबद्दल

Vishal Patil

विशालदादा पाटील

उपाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी

मा. विशालदादा पाटील हे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू व सांगलीचे माजी खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांचे सुपुत्र आहेत. सहकार व संघर्ष याचा वारसा त्यांना घरापासूनच मिळाला आहे. सांगली जिल्ह्यात असणारा जनसंपर्क व राज्य तसेच राष्ट्रपातळीवरील नेत्यांशी असणारे वैयक्तिक संबंध ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

2016 मध्ये मा. विशालदादा पाटील हे वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष झाले. 11 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत वसंतदादा पॅनलला सर्व 21 जागा मिळाल्या. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्याच्या घरी समृद्धी यावी यासाठी त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून कृषिस्नेही निर्णय घेतले. याच कारखानाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनोकाळात मोफत सॅनिटायजरचे वाटप केले. राज्यात अशा प्रकारचे कार्य करणारा वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना हा पहिलाच होता.

२०१९ साली सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. जिल्हाभर प्रचार करीत त्यांनी आपले चिन्ह सर्वदूर पोहचविले. तथापि त्यांना पराभव पत्करावा लागला. पण यामुळे खचून न जाता पुन्हा त्यांनी लोकांमध्ये जात त्यांच्या अडचणी सोडविण्याची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. यामुळे राज्यपातळीवरही त्यांच्या नेतृत्वाचा कस लागत आहे.

काँग्रेसचे विचार, स्व. वसंतदादांच्या विचार आणखी तळागाळापर्यंत कसे पोहोचतील यासाठी मा. विशालदादा पाटील हे प्रयत्नशील आहेत. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे काम मार्गी लावायचे हा वसंतदादांचा स्वभाव त्यांच्यात पुरेपूर उतरला आहे. केवळ अनुकंपा तत्त्वावर नव्हे तर गुणवत्तेवर जनसामान्यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले आहे.

Team Vishal सोबत जोडण्यासाठी संपर्क करा. 

Vishal Patil | Vishal Patil Sangli | Vishal Patil Congress |