कर्नाळ येथील कर्नाळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा डिव्हीडंड वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्त उपस्थित राहून सभासदांना डिव्हीडंड वाटप केले व सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कर्नाळ कार्यकारी संस्थेने नेहमीच सभासदांचे हीत ध्यानात घेऊन वाटचाल केली आहे. तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी सभासदांची आर्थिक तसेच सामाजिक उन्नती व्हावी यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. तसेच अनेक कृतिकार्यक्रम तसेच योजना राबवत त्यांनी सभासदांना ठेवींवरती जास्तीतजास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केला आहे. आणि यापुढेही करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी समवेत मा. पृथ्वीराज पाटील, मा. जयश्रीताई पाटील, इतर सन्माननीय मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.




![]()
