स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीरांच्या सर्वोच्च बलिदानाला उजाळा मिळावा यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित ऐतिहासिक आज़ादी गौरव पदयात्रा दुसऱ्या दिवसअखेर कासेगाव येथे पोहोचली.यावेळी मा.विशाल पाटील यांनी स्वातंत्र्यवीरांना स्मरण करून त्यांचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी येवलेवाडी फाटा ते कासेगाव पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत करून पदयात्रेत सहभाग घेतला.
अनेक क्रांतिकारक व थोर व्यक्तींच्या बलिदानामुळे देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतिवीरांचा गौरवशाली इतिहास व त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आझादी गौरव पदयात्रा नक्कीच मोलाचा वाटा उचलत आहे व यापुढेही उचलत राहील.
यावेळी मा.विशाल पाटील, जतचे आमदार मा. विक्रमसिंह सावंत, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..



![]()
