मौजे डिग्रज येथील श्री. अनिल हवाणे हे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून सेवानिवृत झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला . त्यानिमित्ताने उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने जिल्ह्यातील शेती आणि शेतकर्यांच्या विकासात नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. शंभर वर्षाच्या बॅंकेच्या इतिहासात बॅंकेच्या यशाचा आलेख नेहमीच चढता राहिला. यामागे अनिल हवाणे यांच्यासारख्या कर्मचार्यांनी घेतलेले प्रामाणिक कष्ट कारणीभूत आहेत असे आम्हाला वाटते. त्यांचा सत्कार करताना आनंद झाला.
यावेळी समवेत जयश्रीताई पाटील व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.
![]()

