सहकारमहर्षी स्व. विष्णूआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी उपस्थित राहून मा. विशालदादा पाटील यांनी अभिवादन केले.

सहकारमहर्षी स्व. विष्णूआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्व. विष्णुअण्णांना महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जाते. वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी काहीकाळ भूषविले. सहकार्य क्षेत्रातील त्यांचे कार्य अलौकिक असेच आहे. राजकारण, सहकार व समाजकार्याबरोबर शैक्षणिक कार्यातदेखील ते अग्रस्थानी होते. वसंतदादा आयुर्वेदिक वैद्यक महाविद्यालय सांगली, जीवन शिक्षण विद्यालय, सांगली व विश्वनाथ शामराव पाटील सांगलीचे दंतमहाविद्यालय, अशा अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांच्या कार्याचा दैदिप्यमान वारसा सोबत आहे आणि तो जपण्याचा नेहमीच प्रयत्न राहील. यावेळी अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *