सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी महाअधिवेशन प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना सदिच्छा दिल्या.
महाराष्ट्र हा शिक्षणात प्रगत असून त्याच श्रेय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना आहे. यामध्ये खासगी शिक्षण संस्थांचे महत्त्व देखील अतुलनीय आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रगतीत या संस्थांनी एक सुजाण व सुशिक्षित युवा वर्ग घडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आग्रह धरला महिलांनाही शिक्षण दिले. याशिवाय स्व.कर्मवीर भाऊराव पाटील, स्व.वसंतदादा पाटील तसेच रयतच्या माध्यमातून खा. शरदचंद्र पवार साहेबांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले.
स्व.वसंतदादा पाटील यांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यामुळेच महाराष्ट्रात शिक्षण संस्थाचा विकास होऊन परराज्यातून विद्यार्थी आज शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे. सांगली जिल्हा शिक्षण संस्थां संघाचे कार्य ही अमूल्य आहे. यांच्या पुढील कार्यासाठी सदैव सदिच्छा व या कार्यक्रमादरम्यान केलेल्या सत्काराबद्दल आभार.
याप्रसंगी अध्यक्षा म्हणून खा. सुप्रियाताई सुळे, मा. आ. जयंतराव पाटील, मा. आ. विश्वजीत कदम, ना. सुरेश खाडे, रावसाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.




![]()
