वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे ६५ वी तसेच सन २०२१-२२ आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ६५ वर्षाचा दीर्घ टप्पा पार केला याबद्दल आनंद होतो. सभासद व शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच कारखान्याच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पाऊसमान व्यवस्थित असल्याने कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी वर्षात २०२२-२३ मध्ये जास्तीतजास्त ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवून कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच ऊसतोडीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासंदर्भातील तयारीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकरी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांचे शंकानिरसन केले..
यावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते..





![]()
