सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे नवभारत शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून येथील मान्यवर तथा सभासद सदस्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील अनेक अग्रमानांकित शिक्षण मंडळांपैकी एक म्हणजे नवभारत शिक्षण मंडळ होय. या शिक्षण मंडळाची आज अखेरची कारकीर्द तमाम सांगलीकरांसाठी अभिमानास्पदच आहे. स्थापनेपासून आजतागायत संस्थेने केलेला विस्तार अभूतपूर्व असा असून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान संस्थेच्या नव्या शैक्षणिक उपक्रमाविषयी व पुढील वाटचालीविषयीचे अनेक विषय चर्चेस आले.
याप्रसंगी संस्थेचे सल्लागार मंडळ, सभासद, सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते.




![]()
