मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महानगरपालिकेतर्फे स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मदनभाऊ महाकरंडक-२०२२ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना सदिच्छा दिल्या.
स्व.मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती जपत महापालिकेने आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेस नाट्यकर्मींचा आजअखेर लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून २४ हुन अधिक नाट्यसंस्था या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आल्या आहेत ही खरंच कौतुकाची बाब आहे.
कसदार व वैविध्यपूर्ण अभिनय म्हणजे काय ? हे या एकांकिका मधून स्पष्ट होत असतं. नाटकांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी एकांकिकाद्वारे आपला अभिनयातील कस दाखवून पुढे अनेक मराठी कलाकारांनी नाट्य व चित्रपट सृष्टीत मोठं नाव केलं आहे. या अशा स्पर्धा मोठया प्रमाणात भरवल्या गेल्याने कलाकारांना कला सादर करण्याचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होतं हे महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात या स्पर्धांची व्यापकता वाढवली जाणे देखील तितकेच गरजेचे आहे.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, श्रीमती जयश्रीताई पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.




![]()
