मा. सिकंदर जमादार यांच्या सह्याद्री उद्योग समूहाच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून संस्थेस पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार केला.
सह्याद्री उद्योग समूह अंतर्गत विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच पतसंस्थांची उभारणी करून समूहाचे संस्थापक मा.सिकंदर जमादार सर यांनी या उद्योग-व्यवसायाद्वारे वेगळा आयाम घालून दिला आहे. त्यांचे कार्य हे आजच्या तरुणांसाठी सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची अनुभूती आहे. या समूहाच्या माध्यमातून कित्येक कुटुंबं दोन वेळची भाकरी सुखासमाधानाने खात आहेत. याचे त्यांना नक्कीच मोठे पुण्य लाभत असेल यात शंका नाही. इतक्या वरच न थांबता अविरतपणे नवी क्षितिजे ते सर करीत आहेत ही महत्त्वपूर्ण बाब आहे.
सदर सभेप्रसंगी समवेत आमदार मा. मोहनराव कदम, माजी मंत्री मा. शिवाजीराव नाईक, श्रीमती मा. जयश्रीताई पाटील, मा. पृथ्वीराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.




![]()
