स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रा आज कवठेमहांकाळ येथे पार पडली. यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी क्रांतिकारकांचा तसेच दिवंगत क्रांतिकारकांच्या वंशजांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्व. वसंतदादा पाटील यांचा नातू म्हणून मा. विशालदादा पाटील यांनी यावेळी सत्कार स्वीकारला. यावेळी कवठेमहांकाळ येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेचे स्वागत करून सहभाग घेतला.
सांगली जिल्हा ही क्रांतिकारकांची भूमी, जिल्ह्यातील अनेक ज्ञात, अज्ञात क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या क्रांतिकार्याचा गौरव करण्याचे ऐतिहासिक कार्य आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने होत आहे याचा नक्कीच आनंद वाटतो. यापुढेही क्रांतिकारकांची गौरवगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत राहू..
यावेळी मा. विशालदादा पाटील यांच्या समवेत माजी राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम, मा. विक्रमसिंह सावंत, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..



![]()
