आझाद गौरव पदयात्रेनिमित्त मा. विशालदादा पाटील यांचे स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रेनिमित्त मा. विशालदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वतंत्रसेनानी स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात स्व. वसंतदादांनी मोलाचे योगदान दिले. परकीय ब्रिटिश सत्तेचा निकराने मुकाबला केला. प्रसंगी देहदंड सोसला. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि स्वातंत्र्योत्तर काळात नवमहाराष्ट्राच्या सुदृढ रचनेसाठी अविश्रांत श्रम केले. आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त ते प्राप्त करू शकले. राजकारण आणि समाजकारणात त्यांनी नेहमीच संघर्ष, आणि मतभेद बाजूला ठेवून आणि प्रेम, आपलेपणा आणि विश्वासाने त्यांनी बदलत्या काळाची सांगड घालत भविष्याचा वेध घेत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचा ठसा उमटवला. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना दादांचे जीवनचरित्र नेहमीच प्रेरणा देते. अशी भावना मा. विशालदादा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मा.विशाल पाटील समवेत माजी राज्यमंत्री मा. विश्वजित कदम , सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष मा. मा.पृथ्वीराज पाटील , मा. जयश्रीताई पाटील वाहिनी, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *