स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित आझादी गौरव पदयात्रा काल देवराष्ट्रे येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरू करण्यात आलेली पदयात्रा दिवसभरात भिलवडी येथे येऊन थांबली. यानिमित्ताने उपस्थित राहून सदर पदयात्रेत सहभाग घेतला. तसेच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि काँग्रेस पक्षाचे नाते अतूट आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. त्यांच्या क्रांतिकार्याच्या गौरवगाथेस नव्याने उजाळा मिळावा यासाठी ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे जन्मस्थान असलेल्या देवराष्ट्रे गावातून गौरवशाली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ आझादी गौरव यात्रेस प्रारंभ करण्यात आला. याबद्दल नक्कीच आनंद वाटतो. देवराष्ट्रे ते भिलवडी पदयात्रे दरम्यान मार्गातील सर्व स्वातंत्र्यवीरांच्या तसेच महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच क्रांतिकारकांच्या क्रांतिकार्याला यावेळी उजाळा देण्यात आला.
सदर पदयात्रेस समवेत माजी राज्यमंत्री तथा पलुस-कडेगावचे आ. मा. विश्वजीत कदम, जतचे आ. मा. विक्रम सावंत, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




![]()
