मा. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज काँग्रेस कमिटीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान

मिरज काँग्रेस कमिटी सहयोगाने मा. विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान, मोफत संगणक कोर्स शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त करोली(एम) व भोसे या गावांमध्ये सदर शिबिरांचे उदघाटन केले.
ई-श्रम कार्ड नोंदणीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीवर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांना फायदा होईल. तसेच यामुळे सरकारला असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी योजना बनवणे सोयीचे होणार आहे. यातून असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामुळे सर्वच घटकातील लोकांचा फायदा होणार आहे, तरी जास्तीतजास्त लोकांनी या शिबिरात सहभागी होऊन नोंदणी करावी असे मा. विशालदादा पाटील यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी मिरज तालुक्यातील सन्माननीय मान्यवर, ग्रामस्थ व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *