स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित ऐतिहासिक आज़ादी गौरव पदयात्रा तिसऱ्या दिवसअखेर बेणापूर येथून सुरु झालेली पदयात्रा खानापूर येथे पोहोचली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आझादी गौरव पदयात्रेचे स्वागत करून पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.
जिल्हातील हजारो ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आहे . त्यासाठी अनेकांनी तुरूंगवास पत्करला, प्रसंगी रक्त सांडले. क्रांतीकारकांचा त्याग, बलिदान हा नक्कीच प्रेरणादायी आहे . त्यांचा क्रांतिकारी इतिहास जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहून कार्य करत राहणार आहोत.
यावेळी समवेत मा.विशाल पाटील यांच्या समवेत माजी राज्यमंत्री मा. विश्वजित कदम, मा. विक्रम सावंत , काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..



![]()
