जत तालुक्यातील सोन्याळ येथे सर्व सेवा सो. व्हा. चेअरमन व चेअरमन यांचा तसेच सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा तसेच आसंगी येथे कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मा. विशालदादा पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. विशालदादा यांनी सहकारी सोसायट्या या ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनवाहिन्या. ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सहकारी सोसायट्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच सहकारी सोसायटींच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून कार्य केले आहे. आज सोन्याळ येथील सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहून आनंद झाला. अशी भावना व्यक्त केली. तसेच आसंगी येथे काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास काँग्रेस पक्षाच्या नेत्या व सोलापूरच्या आ. प्रणितीताई शिंदे, मा. विश्वजित कदम, तसेच जतचे आ. मा. विक्रमसिंह सावंत तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

