सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता वेटलिफ्टर संकेत सरगर याच्या कुटुंबीयांची भेट घेत मा. विशालदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता वेटलिफ्टर संकेत सरगर याच्या कुटुंबीयांची भेट घेत मा. विशालदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

सांगलीतील संकेत महादेव सरगर या युवकाने बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. त्याबद्दल मा. विशालदादा पाटील यांनी त्याच्याशी व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे बोलून त्याला ऐतिहासिक यशाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना सर्वसामान्य व बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील संकेतने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यश मिळवत सांगली जिल्ह्याच्या गौरवात भर घातली याबद्दल त्याचा अभिमान वाटतो. कोणतेही यश हे अंतिम नसते हे ध्यानात घेऊन त्याने यापुढेही विविध स्पर्धांबरोबरच ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत धडक मारत पदकांची लयलूट करत सांगलीच्या वैभवात भर घालावी. त्याचे हे ऐतिहासिक यश अनेक सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना प्रेरणा देणारे आहे. अशी भावना व्यक्त केली. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *