सांगली मिरज रोड भारती हॉस्पिटलजवळ डॉ. रवींद्र पाटील व डॉ. शिल्पा पाटील यांच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा ”समर्थ न्यूरो & सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल” चा उदघाटन सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त वसंतदादा कारखान्याचे चेअरमन मा. विशालदादा पाटील यांनी भेट देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
यावेळी बोलतांना मा. विशालदादा पाटील यांनी डॉ. रवींद्र पाटील व शिल्पा पाटील यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त हॉस्पिटलचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल हा विश्वास आहे. तसेच डॉ. रवींद्र व शिल्पा पाटील यांनी नेहमीच रुग्णसेवेचे व्रत घेऊन वाटचाल केली आहे. असे मनोगत व्यक्त केले.
![]()

