सांगलीवाडीचे माजी नगरसेवक मा. दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य होड्यांच्या शर्यतीस मा. विशालदादा पाटील यांची उपस्थिती..

सांगलीवाडीचे माजी नगरसेवक मा. दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “फ्रेंडस युथ फाऊंडेशन” व “रणसंग्राम मंडळ सांगलीवाडी” यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य होड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानिमित्ताने उपस्थित राहून मा. विशालदादा पाटील यांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धेच्या व मा. दिलीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मनगटी ताकद आणि संयमाचा सर्वोच्च कस पाहणार्या होड्यांच्या शर्यती आणि कृष्णा नदी हे समीकरण नेहमीच सांगलीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. आणि आज मा. दिलीप पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकदा प्रत्यय आला. सांगलीच्या वैभवात भर घालणार्या अशा स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात साजर्या होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे अशी भूमिका याप्रसंगी मा. विशालदादा पाटील यांनी मांडली..
याप्रसंगी महेंद्र बागे, शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे साहेब, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जमादार, युसुफ मेस्त्री(सांगली), गुरुप्रसाद धनवडे, अशोक कोळेकर, राजू नदाफ, सागर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *