सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजादी गौरव पदयात्रा व नवसंकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने रविवारी काँग्रेस कमिटी सांगली येथे सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नियोजन बैठक पार पडली.
गौरवयात्रेची सुरुवात ९ ऑगस्टला पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यातून होईल हि गौरवयात्रा पुढे १० तारखेस तासगाव आणि कवठेमहांकाळ, ११ ला आटपाडी आणि खानापूर, १२ ला शिराळा आणि वाळव्याचा काही भाग, १३ ला वाळवा तालुक्यात इस्लामपूर आणि आष्टा, १४ ला जत आणि उमदी तर १५ रोजी गौरवयात्रेचा समारोप होईल. १५ ऑगस्ट दिनी सांगली ते मिरज शहरादरम्यान पदयात्रा होणार असून यात्रेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाने फार मोठे व महत्त्वपूर्ण काम केले आहे. काँग्रेसमुळे या देशाची प्रगती झाली. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहात पदयात्रा काढली जाणार आहे आणि नवा संकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असेल अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मा. विशालदादा पाटील यांनी मांडली..
या बैठकीस मा. विशालदादा पाटील यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस मा. संजय बालगुडे, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, मा. पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
![]()

