केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात सांगली स्टेशन चौक येथे सांगली जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन..

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आदरणीय सोनियाजी गांधी, मा. राहुल गांधीजी यांना ED ची नोटीस पाठवून काँग्रेस पक्ष व विरोधकांचा आवाज दाबू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाविरोधात आज सांगली स्टेशन चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ काँग्रेस पक्षातर्फे मा. विशालदादा पाटील यांनी निषेध आंदोलन केले.
यावेळी बोलतांना मा. विशालदादा पाटील यांनी, जी केस ED नेच २०१५ साली बंद केली होती ती आत्ता तब्बल ७ वर्षानंतर पुन्हा उघड करण्याचे कारणच काय? सत्ता हेच सर्वस्व मानून वाटचाल करीत असलेली भाजपा प्रशासनाच्या सर्वच पातळ्यांवर वेळोवेळी अपयशी ठरत आलेली आहे. आणि आपले अपयश झाकण्यासाठी आणि सरकार विरोधातला जनतेचा आवाज दडपण्यासाठी, केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करीत आहे.
काँग्रेस नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या हुकूमशाही सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. पण ही दडपशाही काँग्रेस पक्ष सहन करणार नाही.
केवळ जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेल्या कारवाईमुळे काँग्रेस पक्ष डगमगनार नाही हे नरेंद्र मोदी व भाजप सरकारने लक्षात घ्यावे. काँग्रेस पक्ष पुन्हा त्याच ताकदीने सर्वसामान्यांचे हक्क आणि अधिकारासाठी आणि मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात यापुढेही लढत राहील. अशी भूमिका व्यक्त केली..
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. विक्रमसिंह सावंत, मा. विश्वजित कदम, सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच इतर सन्माननीय मान्यवर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *