स्व. वसंतदादा पाटील व सहकाऱ्यांच्या ऐतिहासिक सांगली जेलफोड कृतीला ७९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मा. विशालदादा पाटील यांची क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभास भेट…

स्व. वसंतदादा पाटील व सहकाऱ्यांच्या ऐतिहासिक सांगली जेलफोड कृतीला ७९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मा. विशालदादा पाटील यांनी क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभास भेट देऊन पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना मा. विशालदादा पाटील, – भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक मोठे उठाव झाले, अनेक लढे झाले पण इंग्रजांच्या छाताडावर लाथ मारून सांगली जिल्ह्यातील थोर क्रांतिकारकांनी 24 जुलै 1943 रोजी सांगलीचा जेल फोडून जी ऐतिहासिक उडी घेतली होती ती अभूतपूर्वचं होती. इंग्रज सरकारच्या काळजात धडकी भरवण्याचे कार्य या जेलफोड कृतीने केले अशी भूमिका मांडली..
याप्रसंगी या लढ्यात सहभागी असलेल्या क्रांतिवीरांच्या कुटुंबीयांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या लढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते स्व. वसंतदादा यांचा कुटुंबीय या नात्याने मा. विशालदादा पाटील यांनी गौरवचिन्ह स्वीकारले.

या कार्यक्रमास काँग्रेसचे सांगली जिल्हा प्रभारी मा.संजय बालगुडे, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *