वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथील लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न…

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथील लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यानिमित्ताने कारखान्याचे चेअरमन मा. विशालदादा पाटील यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
यावेळी लक्ष्मीदेवीची महापूजा व त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने बोलताना मा. विशालदादा पाटील यांनी, अगदी कारखान्याच्या स्थापनेपासून येथील लक्ष्मी देवीची यात्रा कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी पुढाकार घेऊन येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आणि ही परंपरा यावर्षीही सर्वांनी मिळून अबाधित राखली याबद्दल आनंद होतोय असे मनोगत व्यक्त केले..
यावेळी कारखान्याचे संचालक अमित पाटील, सर्व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *