जीवनावश्यक वस्तूंच्या जीएसटी विरोधात सांगली येथे मा. विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन..

केंद्र सरकारने लावलेल्या GST विरोधात महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष मा. विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना मा. विशालदादा पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला जनतेचे काडीमात्र सोयरसुतक नाही. दोन दिवसांपूर्वी केंद्राने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंवर GST आकारत हे पुन्हा सिद्ध केले आहे. सत्तेत आलेले मोदी सरकार हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत दिवसेंदिवस लोटत चालली आहे याकडे मोदी हेतुपरस्पद दुर्लक्ष करीत आहेत. गॅस दरवाढ, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी यापलीकडे केंद्रीय सत्तेने आज अखेर जनतेस काहीच दिले नाही.
तसेच या कारवाढीमुळे हातावर पोट असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील नागरिकांच्या वाट्यालाही या निर्णयाने मरण येईल. या एका निर्णयाने फक्त ग्राहक नाही तर व्यापारी वर्गास सुद्धा याची झळ सोसावी लागणार आहे. तेव्हा केंद्र सरकारने फेरविचार करून हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात हा निषेध आणखी तीव्र केला जाईल अशी भूमिका मा. विशालदादा पाटील यांनी मांडली..
या निषेध आंदोलन प्रसंगी समवेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *