सहकार जडणघडणीमधील विशालदादा

सहकार जडणघडणीमधील विशालदादा – पुरोगामी विचारांची मनाशी खूणगाठ बांधून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक तत्वनिष्ठ लोकहितवादी नेतृत्व म्हणून विशाल दादा पाटील यांच्याकडे पहिले जाते. काँग्रेसपक्षाशी निष्ठा, निस्वार्थी स्वभाव, स्वच्छ चारित्र्य व जनहितासाठी सदैव तत्पर असे हे नेतृत्व सहकाराच्या जडणघडणीशी सुद्धा तितकेच बांधील आहे. सहकार क्षेत्रातील आपला गाडा अभ्यास सहकाराच्या उन्नतीमध्ये कसा उपयोगी पडेल याचा परिपूर्ण विचार करून विशालदादा मार्गक्रमण करीत आहेत. सहकार चळवळीतून शेतकरी व कष्टकऱ्यांचा आर्थिक विकास या उद्दात्त हेतूने तळागाळापर्यंत पोहोचण्याचा विशालदादा प्रयत्न करीत आहेत. समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याची तळमळ विशालदादांच्या अंगी नेहमीच दिसून येते. उच्चविद्याविभूषीत असलेले विशालदादा हे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे आपली जबाबदारी पेलत आहेत. समर्पण, प्रांजळपणा व विशाल स्नेहभाव हे वसंतदादांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कारखान्यात कार्य करीत असताना विशालदादांच्या कृतीतून सहजपणे दिसून येतात. कारखान्याच्या विविध विभागांमध्ये विशालदादा जातीने लक्ष देत असतात. “ऊस उत्पादक शेतकरी हाच साखर कारखान्याचा मालक असतो” असे ते नेहमीच आवर्जून सांगतात. “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर कारखाना अखंडपणे चालू राहण्यासाठी विशालदादा नेहमीच प्रयत्नशील असतात. सहकारी तत्त्वावर उभा करण्यात आलेला वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व वसंतदादांच्या ध्येयवादाने सुरु झाला. ज्या माळावर दिवसा चिटपाखरू ही फिरकत नव्हते अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या घामातून व जिद्दीतून स्व.वसंतदादांनी कारखाना उभा केला. पश्चिम महाराष्ट्र हा तसा डोंगर दऱ्यांचा प्रदेश पण अशा प्रदेशात जिथे नेहमीच पाण्याची वाताहत असायची तिथे कारखाना काढण्याचं धाडस वसंतदादांनी दाखवले. असा हा उत्तुंग ध्येयवादाचा वारसा विशाल दादांना नेहमीच एक वेगळी ऊर्जा देत राहतो. या अत्युच्य ऊर्जेचा प्रवाह कोठे ही थांबता कामा नये यासाठी किंवा कोठेही अडसर निर्माण झाल्यास पोटतिडकीने तो अडसर धूर करण्यासाठी विशालदादा जीवापाड प्रयत्न करतात. विशालदादांमध्ये स्व. वसंतदादांचे रूप दिसते यामुळे आजही अनेक कार्यकर्ते गहिवरतात. “लाखो ह्रदये गहिवरती तर मन माझेही गहिवरते, असे लाखोंसंगे आहे जडलेले माझे नाते.” या काव्यपंक्ती विशालदादांना हुबेहूब लागू पडतात.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *