मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल” विजय

मनपा पोटनिवडणुकीतला काँग्रेसचा “विशाल”विजय सांगली महापालिकेत प्रभाग क्रमांक १६ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तौफिक हारुण शिकलगार यांच्या विजयाने सांगलीच्या जनतेने काँग्रेस पक्ष व नेतृत्वावर परत एकदा विश्वास दाखवलाय हे सिद्ध झालेलं आहे. तौफिक शिकलगार यांच्या विजयात विशालदादांची भूमिका निर्णायक राहिली. अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच विशालदादा प्रत्येक आघाडीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. हारूण शिकलगार यांची पुण्याई व जनतेचा दादा घराण्यावरचा विश्वास परत एकदा कामी आला असच या निवडणुकीचे विश्लेषण करता येईल. सांगलीच्या राजकारणात विशालदादांचा राजकीय आलेख दिवसेंदिवस वाढत असलेला पाहायला मिळतोय. स्व. वसंतदादांच्या विचारांचा वारसा पाठीशी ठेवून विशालदादा जश्यास तसे उत्तर देत मार्गक्रमण करीत आहेत. २०१९ च्या लोकसभेतला थोडक्यात झालेला पराभव सोडल्यास त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ताकदीने निवडणूका लढवल्या, तिथे त्यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसची विचारसरणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना इथला सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे हेच ध्येय उराशी बाळगून विशालदादा मार्गक्रमण करीत आहेत. विशालदादांची तरुणांच्यात वाढती लोकप्रियता नक्कीच कार्यकर्त्यांसाठी ऊर्जास्रोत सिद्ध होत आहे. स्वामी विवेकानंदांचा उठा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं उद्दिष्ठ साध्य होत नाही… हा मंत्र विशालदादा अक्षरशः जगत आहेत. आज काँग्रेस महापालिकेतील विजयाबद्दल साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ती आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही विशालदादांच्या नेतृत्वाखाली मिळत राहणार आहे. विशालदादा ज्या सांगलीकरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होत आहेत त्या सांगलीकरांचे पूर्वज वसंतदादांच्या घराण्यावर खूप प्रेम करायचे. आजही सांगलीकरांचा विश्वास दादा घराण्यावरच आहे शिवाय ते आजही विशालदादांच्या पाठिशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे आहेत. आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा सांगलीच्या निर्मितीसाठी विशालदादांच्या हाताला आपले बळ मिळत आहे हे नक्की.Vishal PatilIndian National Congress – Maharashtra#sangli#vishalpatil#mahanagarpalika#election

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *