Memorable dada

दादा मी नंदू बीड वरून आलोय

गेटवर भेटलेल्या बीडच्या पोराला राज्यपालांनी राजभवनात राहण्यासाठी नेलं..हा राज्यपाल सदासर्वकाळ जनसामान्यांना भेटू लागला. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागला. राजस्थानच्या जनतेचे देखील ते लाडके दादाजी बनले होते. त्यांचं मोडकं तोडकं हिंदी कानाला गोड वाटायचं. त्या बोलण्यात प्रेमाचं दर्शन घडायचं.एकदा असच दुपारच्या वेळी दादा राजभवनाच्या हिरवळीत धोतर बंडी या वेशात ऊन खात बसले होते. अचानक त्यांना गेटवर […]

Loading

दादा मी नंदू बीड वरून आलोय Read More »

आपलं दादा हायत दिल्लीत हे सगळं दादांना सांगूया

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक पर्यटनासाठी दिल्लीला गेले होते. सर्व लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याकडील सर्व रक्कम एकत्र जमा केली. आणि आपल्या एका सह्कार्यापाशी ती बॅग ठेवून दिली. ती रक्कम जवळपास तीसहजार होती.दिल्लीत फिरत असताना ती बॅग गर्दीत चोरीला गेली. बॅग

Loading

आपलं दादा हायत दिल्लीत हे सगळं दादांना सांगूया Read More »

वसंता है ऐकताच दादांनी कडकडून मिठी मारली.

एकदा वसंतदादांच्या गावच्या शेतकरी मित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होत. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याच्याजवळ गेला.त्याला पोलीस आत सोडत नव्हते. तो तिथंच उभा राहिला. योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले. या शेतकऱ्याने त्यांना जोरानं हाक मारली“वसंता है….ती गावाकडच्या शेतकऱ्याची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले.कडकडून मिठी

Loading

वसंता है ऐकताच दादांनी कडकडून मिठी मारली. Read More »

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतरची एक घटना आहे

रस्त्यावरून एक ट्रक चाललेला. ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकानं त्या ट्रकला हात करत विचारलं.“काय झालंय ?”“आरं, आपलं दादा मुख्यमंत्री झाल्याती” ट्रकमधल्या माणसानं सांगितलं.“आपलं वसंतदादा ?”“होय. ““मग चला मीबी येतो ““आरं, पण तुझ्या अंगावर ही रानातली कापड हायती”“त्येला काय हुतंय. आपुन दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलचं हायती.”

Loading

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतरची एक घटना आहे Read More »

जनसामान्यांचा दादा माणूस –

महाराष्ट्र दादांना कधीही विसरू शकणार नाही. एक स्वातंत्र्यसेनानी, देशासाठी पाठीवर गोळी झेललेला एक लढवय्या नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन क्रांतिकारी विचारधारा बदलून विकासाचा, सहकाराचा विचार राबवून माळरानावर सहकार फुलवणारा महाराष्ट्राचा फार न शिकलेला शहाणा माणूस म्हणजे दादा.लाखो सर्वसामान्यांच्या विश्वासाची शिदोरी दादांना लाभली होती. अनेकजण दादांकडे मदतीच्या अपेक्षेने येत असत व दादाही त्यांना सढळ हाताने मदत करीत

Loading

जनसामान्यांचा दादा माणूस – Read More »