अखेर विशाल दादाचं लढणार सांगली लोकसभा

अखेर विशालदादा पाटील विधानसभा की लोकसभा लढवणार हा कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला असून विशालदादांनी लोकसभाच लढवणार हे जाहीर केलं आहे. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळे त्यांना पक्षातूनच विरोध वाढत आहे. अशा परिस्थितीत वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा परत एकदा भाजपच्या हातून हिसकावून घेण्यास विशालदादा पाटील सज्ज होत आहेत असं त्यांनी निवडणुकांना अजून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना जाहीर केलंय यावरून म्हणता येईल. २०१४ ची किंवा २०१९ ची मोदीलाट आत्ता राहिलेली नाही हे अनेक राज्यात भाजप नेते व कार्यकर्त्यांना होत असलेल्या विरोधातून स्पष्ठच दिसत आहे. आज कितीही काँग्रेसला वगळून तिसऱ्या चौथ्या आघाडीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी काँग्रेस व्यतिरिक्त भाजपशी देशपातळीवर लढू शकेल असा एकही ताकदीचा पक्ष नाही हे उघड सत्य आहे. गुजरात, राजस्थान, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ही अशी राज्ये आहेत जिथे सरळसरळ मुकाबला भाजप विरुद्ध काँग्रेस असा समोरासमोर आहे. आणि ही संख्या १५० जागेच्या वर आहे. आज काँग्रेस राजस्थान, छत्तीसगढ, या राज्यांच्या सत्तेत आहे. तर गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यात भाजपच्या बरोबरीचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी पक्ष आहे. आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीत सामील होण्याने काँग्रेससाठी एक नवा मित्रपक्ष भाजपविरोधी आघाडीत सामील झाला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी आणीबाणीनंतरच्या जनता पक्षाच्या लाटेतही वसंतदादांच्या नेतृत्वाखाली सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसने राखला. विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष परत एकदा आपला बालेकिल्ला भाजपकडून खेचण्यासाठी सज्ज होत आहे.Vishal PatilIndian National CongressIndian National Congress – Maharashtra#vasantdadapatil#vasantdada#VishalPatil#vishaldada#dada#Congress#inc#INCMaharashtra#CongressParty#CongressKeVichaar#sangli#Miraj

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *