सांगली जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व – विशालदादा पाटील

सांगली जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व – विशालदादा पाटील वसंतदादा घराण्याचा वारसा आज विशालदादा पाटील मोठ्या हिम्मतीने चालवत आहेत. आज कोणतीही सत्तापदे हाती नसतानाही तरुणांच्यात त्यांनी निर्माण केलेली स्वतःची क्रेझ विलक्षणच म्हणायला हवी. २०१४ नंतर वसंतदादा घराण्यातले कोणीही कोणत्याही पदावर नसतानाही वसंतदादांच्या समाजसेवेचा व राजकारणाचा आशेचा किरण म्हणून विशालदादांकडे पाहिले जात आहे. पुरोगामी विचारांचा सच्चा पाईक पुन्हा एकदा नव्या जोमाने येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करेल यात शंका नाही. राजकारणातून वसंतदादा घराणे संपले या अपप्रचाराला विशालदादा पुरून उरत आहेत. हातातून गेलेल्या संस्था ते लोकांच्या माध्यमातून परत मिळवत त्यांना गतवैभव मिळवून देतील याबद्दल कोणतीही शंका नाही. सांगली जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना याची ताजी उदाहरणे आहेत. समाजकारणी विशालदादा – सांगली जिल्ह्याच्या विकासात वसंतदादांचे योगदान अनन्यसाधारण आहे हे ध्यानात घेऊन तो विकासाचा वारसा विशालदादा कोणतीही सत्तापदे हातात नसताना जपत आहेत. वसंतदादांनी आशिया खंडातील सगळ्यात मोठा कारखाना सांगलीत उभारला. सांगली औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. रुग्णांसाठी स्वस्तात उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा रुग्णालयाची स्थापना केली. सांगली आकाशवाणी अशा अगणित प्रकल्प व कार्याच्या माध्यमातून सांगलीच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आज तोच वारसा विशालदादांच्या खांद्यावर आला असून विशालदादा तो समर्थपणे सांभाळत आहेत. ‘मी सक्षमा’ या सामाजिक संस्थेमार्फत विशालदादांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. महिला सबलीकरण हे या संस्थेचे उद्दिष्ट असले तरी इतरही अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जात आहेत. तसेच कोरोनाच्या काळात सॅनिटायझर निर्मितीचे पहिले श्रेयही विशालदादांच्या नेतृत्वातील वसंतदादा कारखान्यालाच जाते. राजकारणातले विशालदादा – विशालदादांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष परत एकदा मजबुतीने उभा राहतोय. विशालदादांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचे व वसंतदादा घराण्यावर प्रेम असणारे तरुण सज्ज होत आहेत. राज्यातील काँग्रेस पक्षाने देखील विशालदादांचे महत्व ओळखून त्यांना राज्याचे काँग्रेस उपाध्यक्ष पद देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केलाय. विशालदादांचे वक्तृत्व हे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जामंत्र ठरत असून तरुणांना विशालदादा आपलीच भाषा बोलताहेत असं मनोमन वाटतं. सांगली जिल्हा बँक, वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून विशालदादांनी आपलं प्रशासनातील कौशल्य दाखवून दिलेलं आहे. जिल्ह्याच्या राजकारणात विशालदादांची वाढती लोकप्रियता व जनसंपर्क हा काँग्रेस पक्षासाठी दिवसेंदिवस संजीवनी बुटीचे काम करत आहे इतकं नक्की. येणारा पुढील काळ हा नक्कीच विशालदादांसाठी व सांगली जिल्ह्यासाठी सुवर्णकाळ असेल यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *